भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें

gele palale divas roj | kay mhanatosi majhen majhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥ सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥ कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥ हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥३॥ तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥४॥ तुका म्हणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥५॥