भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें

gayen nachen vayen tali | sadhan kali uttam hen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥ काय जाणों तरले किती । नाव आयती या बैसा ॥ध्रु.॥ सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥