भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह

gaulani bandhiti dharanasi gala | khele tya gopalammaji bramha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥ तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥२॥