भजनी मालिका
← भजनांकडे परत

गासी तरि एक विठ्ठल चि गाई । नाहीं तरि ठायीं राहें उगा

gasi tari ek viththal chi gai | nahin tari thayin rahen uga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गासी तरि एक विठ्ठल चि गाई । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥१॥ अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा सीण करिसी वांयां ॥२॥ तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाहीं चित्ती निलाजिरा ॥३॥