भजनी मालिका
← भजनांकडे परत

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन

garudachen variken kase pitambar | sanvalen manohar kain dekhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥ तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥५॥