भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी

gangajala pahin pathi pot nahin | avagun to kanhin amrutasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥ रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥ कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥२॥ परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥३॥ तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥४॥