भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ

ganga na dekhe vital | ten chi ranjanin hi jal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥ अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥ काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥२॥ तुका म्हणे अगीविण । बीज वेगळे तों भिन्न ॥३॥