भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी

ganga geli sindhupashin | jari to thav nedi tishi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥ तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥ जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥२॥ तुका म्हणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन ॥३॥