भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि करावें मूळक्षेत्र

gandharvanagarin kshan ek rahaven | ten chi karaven mulakshetra

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि करावें मूळक्षेत्र ॥१॥ खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥ वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥२॥ मृगजळी पोहे घालुनि सज्ञाना । तापलिया जना तोषवावें ॥३॥ तुका म्हणे मिथ्या देहेंद्रियकर्म । ब्रम्हार्पण ब्रम्ह होय बापा ॥४॥