भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे

gajendra to hasti sahasra varushen | jalamaji nakren pidilase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥ सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥ कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥२॥ तुका म्हणे नेले वाऊनि विमानी । मी ही आईकोनी विश्वासलों ॥३॥