भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी

gajarachi pungi | taise nave jale jogi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥ काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥ अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥२॥ तुका म्हणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥३॥