भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा

gajaindra pashu apten mokalila | to tuj smarala panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥ त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥ धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥२॥ तुका म्हणे ब्रीद बांधलें यासाठीं । भक्तंसी संकटीं रक्षावया ॥३॥