भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनींचा गगनीं तेज पूर्ण धरणी

gaganincha gaganin tej purna dharani

गगनींचा गगनीं तेज पूर्ण धरणी । आपणची तरणी जगा यया ॥१॥ ब्रह्म माजीवडे गोपाळ संगती । वेद वाखणिती ज्याची महिमा ॥२॥ लोपती त्या तारा हारपे दिनमणि । तो खेळे चक्रपाणी गोपाळामाजी ॥३॥ निवृत्ति निधान श्रीरंग खेळतु । गोपिकासी मातु हळुहळु ॥४॥