भजनी मालिका
← भजनांकडे परत

एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती

evadhi apakirti | aikoniyan phajiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥ जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥ काळिमेचें जिणें । जीवोनियां राहे सुनें ॥२॥ तुका म्हणे गुण । दरुषणें अपशकुन ॥३॥