भजनी मालिका
← भजनांकडे परत

एवढा संकोच तरि कां व्यालासी । आह्मी कोणांपाशीं तोंड वासूं

evadha sankoch tari kan vyalasi | ahmi konampashin tond vasun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एवढा संकोच तरि कां व्यालासी । आह्मी कोणांपाशीं तोंड वासूं ॥१॥ कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुह्मीं देवा ॥ध्रु.॥ कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥२॥ कोण जाणे माझे जीवींचें सांकडें । उगवील कोडें संकटाचें॥३॥ तुका म्हणे तुह्मी देखिली निश्चिंती । काय माझे चित्तीं पांडुरंगा ॥४॥