भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति हे

ekavidh vrutti na rahe antarin | smaranin cha hari vismruti he

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति हे ॥१॥ कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥ न राहे निश्चळि जागवितां मने । किती क्षीणेंक्षीणें सावरावें ॥२॥ तुका म्हणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥३॥