भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण

ekavidh narayan | tethen vishamacha sin | palaton chi bhinna | naye anupraman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥ अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥ कायावाचामन । स्वरूपे चि अनुसंधान । लक्ष भेदी बाण । ये पाडें लवलाहो ॥२॥ तुका म्हणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥३॥