भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली

ekavidh amhi na dharun palat | na sandun te vat sampadali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥ म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥ बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्षी असे ॥२॥ तुका म्हणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥३॥