भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें

ekantin lokantin karun gadarol | lesh to hi mal nahin yethen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥१॥ घ्यावें द्यावें आह्मीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥ भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥२॥ तुका म्हणे आम्हां विश्वासाच्या बळें । ठेविलें मोकळें देवें येथें ॥३॥