भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों

ekadashivrat somavar na kariti | kon tyanchi gati hoil nenon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥ हरीहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥