भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें

ekachiye soi kavitvache bandhe | bandhiliya sadhe kay tethen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकाचिये सोई कवित्वाचे बांधे । बांधिलिया साधे काय तेथें ॥१॥ काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥ कवित्वाचे रूढी पायां पडे जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥ तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥३॥