भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका बोटाची निशाणी । परीपाक नाहीं मनीं

eka botachi nishani | paripak nahin manin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका बोटाची निशाणी । परीपाक नाहीं मनीं ॥१॥ तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां व्यंग ॥ध्रु.॥ वैष्णवांचा धर्म। जग विष्णु नेणे वर्म ॥२॥ अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥३॥