भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका ऐसें एक होतें कोण्याकाळें । समर्थाच्या बळें काय नव्हे

eka aisen ek hoten konyakalen | samarthachya balen kay navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका ऐसें एक होतें कोण्याकाळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥ घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥ केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥ तुका म्हणे जाली अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥३॥