भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें

ek man tujhya avaghya bhandavala | vantitan ten tula yei kaisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें ॥१॥ म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥ आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरीच कारण साध्य होय ॥२॥ तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येईल कळों ॥३॥