भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती

ek bhav chittin | tarin na lage kanhin yukti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥ कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥ आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥२॥ तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥