भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें

dya ji amhan kanhin sanga ji rakhumai | shesh uralen thayin sanakadikanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥ टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥ येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥ प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥३॥