भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वेषाचिया ध्यानें हरीरूप झाले । भाव हारपले देहादिक

dveshachiya dhyanen harirup jhale | bhav harapale dehadik

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्वेषाचिया ध्यानें हरीरूप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥ देहादिक कर्म अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥ नारायण जोडे एकविध भावें । तुका म्हणे जीवें जाणें लागे ॥३॥