भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत

dvarakechen kenen alen ya chi thaya | pudhen bhaktaraya chojavit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥ वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥ लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांठविलें ॥३॥ तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥