भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें

dushta bhushan sajjanachen | alabhyalabh punya tyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥ धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥ मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥ तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥