भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे

dushta acharan gvahi majhen man | maj thave gun dosh majhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥ आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥ व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिज तो काळ नव्हे कांहीं ॥२॥ तुका म्हणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुम्हां हातीं ॥३॥