भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नार्काचा कोथळ सांटवला

durjanachen ang avaghen chi saral | narkacha kothal santavala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नार्काचा कोथळ सांटवला ॥१॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥ सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥ तुका म्हणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखटयाची ॥३॥