भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी

durbalache hatin sampadalen dhan | karitan jatan naye tyasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥ तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥ खातां लेतां नये मिरवितां वरी । राजा दंड करी जनराग ॥२॥ तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥