भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरी या अनंता पासूनिया

duja ainsa kon bali ahe atan | hari ya ananta pasuniya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरी या अनंता पासूनिया ॥१॥ बळियाच्या आम्ही झालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । झालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥