भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय

duhkhachiye satin tethen mile sukh | anathachi bhuk dainya jay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥१॥ जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आळीगिया आवडी करूनियां ॥२॥ शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥ तुका म्हणे असों अनाथ दुबळीं । आम्हांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥