भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी

dudhal gadhavi jari jali pahe | pavel te kay dhenusari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥ कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥ध्रु.॥ मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥ जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥