भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार

dudh dahin tak pashuchen palan | tyammadhyen karan ghrutasar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥ हें चि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥ लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥ तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरी हें धन हातीं लागे ॥३॥