भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें

dosh palati kirtanen | tujhya namen sankirtanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥ हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥ तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजावया चिंता ॥२॥ तुका म्हणे सेवा । कळीकाळा जिंकी देवा ॥३॥