भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी

dohimmadhyen ek ghadel vishvasen | bhatuken sarisen mul tari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥ करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ध्रु.॥ लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥२॥ अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥३॥ व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका म्हणे मना मन साक्ष ॥४॥