भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित

dip gheuniyan dhunditi andhar | bhete ha vichar aghatit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥ विष्णुदास आम्ही न भीओ कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥ उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥ तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥३॥