भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें

dili man tari neghavi shatruchi | sharan alen tyasi jatan jiven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥ समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥ काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥ तुका म्हणे यश कीर्ती आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥