भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव

dila jivabhav | tevhan sandila myan thav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥१॥ आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥ माझीया मरणें । तुम्ही बैसविलें ठाणें ॥२॥ तुका म्हणे कांहीं । मी हें माझें येथें नाहीं॥३॥