भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची

dik chi ya nahin sansarasambandha | tutena ya badha bhavarogachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥ तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥ संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥३॥