भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवें दिला देह भजना गोमटा । तों या झाला भांटा बाधिकेच्या

deven dila deh bhajana gomata | ton ya jhala bhanta badhikechya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवें दिला देह भजना गोमटा । तों या झाला भांटा बाधिकेच्या ॥१॥ ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नदी ॥ध्रु.॥ दास म्हणावया न वळे रसना । सइर वचना बा सगळे ॥२॥ तुका म्हणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥३॥