भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें

deven deul sevilen | udak koraden chi thevilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥ नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणापें पाहीं ॥ध्रु.॥ पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥ वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥ तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥