भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे

deve kele kaise kaise | uddharile anayase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे ॥१॥ ऐका नवलायाची ठेव । नेणताही भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बसैला ॥२॥ पंखांच्या फडत्कारी । उद्धरुनी नेली घारी ॥३॥ चोरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाय देव ॥४॥ तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हा कोवळा ॥५॥