भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं

devamukutamani aikije puranin

देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं । तो हा चक्रपाणी नंदाघरें ॥१॥ नंदानंदान हरि गौळण गोरस । गोकुळीं हृषीकेश खेळतसे ॥२॥ हरि हा सकुमार भौमासुर पैजा । वोळलासे द्विजा धर्मा घरीं ॥३॥ निवृत्ति रोकडे नाम फाडोवाडें । हरिरूप चहूंकडे दिसे आम्हां ॥४॥