भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचा भक्ती तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला

devacha bhakti to devasi god | anikansi chad nahin tyachi | kavanacha soira navhe cha sangati | avaghiyan hatin antarala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचा भक्ती तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥ निष्काम वेडें म्हणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा । माझें ऐसें तया न म्हणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥ प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी । कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जालें ॥२॥ गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आई बाप भाऊ । घरी बाइल म्हणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥३॥ जन्मोनि जाला अवघियां वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो । तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणें चि ठाकिला सिद्धपंथ ॥४॥