भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश

deva tun krupakarunasindhu | hosi mayabap amacha bandhu| jivanasiddhi sadhanasindhu | todisi bhavabandhu kalapash

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥ शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥ भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥२॥ नेणें भाव परि म्हणवीं तुझा । नेणें भक्ती परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥३॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥४॥