भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तूं आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी

deva tun amacha krupal | bhaktipratipal dinavatsal | may tun mauli snehal | bhar sakal chalavisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवा तूं आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥ आम्हां भय चिंता नाहीं धाक जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥३॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्नुं कीर्ती तया सुखा ॥४॥ तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥५॥