भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें

deva aiken he vinanti | maj nako re he mukti | taya ichchha gati | hen chi sukh agalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥१॥ या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धीसिद्धी द्वारीं । कर जोडूनि तिष्ठती ॥ध्रु.॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥२॥ तुझ्या नामाचा महिमा । तुज नकळे मेघशामा । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठी ॥३॥